शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

राजेश टोपे यांनी घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची धावती भेट; ५ मिनिटांच्या भेटीनंतर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 12:33 IST

दहव्या दिवशी उपोषणस्थळी केवळ पाच मिनिटांची भेट, उपोषणकर्त्यांशी केवळ एकच मिनिट संवाद साधल्याने ओबीसी बांधव नाराज

- पवन पवार 

वडीगोद्री ( जालना) : ओबीसी नेते उपोषणार्थी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. दरम्यान, आज सकाळी घनसावंगी मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री राजेश टोपे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. मात्र अवघ्या ५ मिनिटांची धावती भेट देऊन गेल्याने ओबीसी बांधवाकडून नाराजीचा सूर निघत आहे.

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात हाके यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. यावर शुक्रवारी सायंकाळी मुंबईत ओबीसी शिष्टमंडळ आणि राज्यसरकार यांच्यात बैठक झाली आहे. तसेच आज दुपारी राज्य सरकारचे शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, आज सकाळी माजी मंत्री राजेश टोपे यांनी उपोषणस्थळी धावती भेट दिली. त्यानंतर टोपे म्हणाले की, स्थानिक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. महाराष्ट्र हा साधू संतांचा वारकरी संप्रदायाचा आणि समाज सुधारकांचा आहे. आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सुटावा. कुठेही तेढ निर्माण होऊ नये, अशा भावना टोपे यांनी व्यक्त केल्या.

अशी कोणती धावपळ आहे..: नवनाथ वाघमारेमी राजेश टोपे यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांना सर्व समाज सारखा असला पाहिजे. मनोज जरांगे यांच्याकडे एवढं तात्काळ जातात. आमच्याकडे दहाव्या दिवशी येत फक्त एक मिनिटं भेट घेतली. आमच्या मागण्या सुद्धा विचारल्या नाहीत. टोपे साहेबामागे अशी कोणती धावपळ आहे. आज का हे मंत्री आहेत का ? असा सवाल उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी टोपेंना केला.

शासनाकडून लेखी मिळालं नाही : लक्ष्मण हाकेशासनाकडून कोणत्याही मागणीवर लेखी मिळालं नाही. ओबीसीचा प्रश्न म्हटल्यावर आपल्याकडे प्राधान्य नाही का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी सरकारला केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली. येणाऱ्या अधिवेशनामध्ये चर्चा होईल असे उत्तर मिळालं. आम्ही येथेच बसायला तयार आहोत त्यांनीही बसाव. हे कायद्याचं राज्य आहे का ? हे सामाजिक न्यायाचे राज्य आहे का? बांठीया आयोगाचा रिपोर्ट मान्य नाही..बांठीया कमिटीचे रिपोर्ट हा सॅम्पल सर्वे आहे, त्यामुळे तो मान्य करायचा प्रश्न उरत नाही, असेही लक्ष्मण हाके म्हणाले आहे.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालनाlaxman hakeलक्ष्मण हाकेRajesh Topeराजेश टोपे