सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST2021-07-12T04:19:31+5:302021-07-12T04:19:31+5:30

जालना : सर्वसामान्यांचे आज एक ना अनेक प्रश्न आहेत. सर्वसामान्यांच्या या प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी, सदस्यांनी आवाज उठवून ते ...

Raise your voice on common questions | सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवा

सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवा

जालना : सर्वसामान्यांचे आज एक ना अनेक प्रश्न आहेत. सर्वसामान्यांच्या या प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी, सदस्यांनी आवाज उठवून ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष संतोष गाजरे यांनी केले.

संभाजी ब्रिगेडच्या घनसावंगी तालुका पदाधिकाऱ्यांच्या शनिवारी आयोजित बैठकीत निवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. दक्षिण जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस उत्तर जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद जाधव, जिल्हा सचिव जगन्नाथ काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उढाण, अरविंद घोगरे, तालुकाध्यक्ष महादेव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कैलास खांडेभराड, विजय वाडेकर, ज्ञानेश्वर उढाण, शाहीर अरविंद घोगरे, महादेव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस रामेश्वर मोटे, राहुल आटकाळे, दीपक वाढेकर, प्रवीण टरले, बाळासाहेब उगले यांच्यासह इतर नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीस डिगंबर मोटे, लक्ष्मण व्यवहारे, योगेश सपाटे, संजय टरले, जगदीश सावंत, गणेश गायकवाड, सचिन सपाटे, हनुमान ढेरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

.....फोटो

Web Title: Raise your voice on common questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.