कुरेशी समाजाचा मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:35 IST2021-09-15T04:35:05+5:302021-09-15T04:35:05+5:30

जालना : ऑल इंडिया जमियतुल कुरेशी संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित कुरेशी समाजाच्या मेळाव्यास प्रतिसाद मिळाला. यावेळी आयोजित शिबिरात ५४ ...

Qureshi community gathering in excitement | कुरेशी समाजाचा मेळावा उत्साहात

कुरेशी समाजाचा मेळावा उत्साहात

जालना : ऑल इंडिया जमियतुल कुरेशी संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित कुरेशी समाजाच्या मेळाव्यास प्रतिसाद मिळाला. यावेळी आयोजित शिबिरात ५४ दात्यांनी रक्तदानही केले.

महेमुद पहेलवान कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास ऑल इंडिया जमियतुल कुरेशचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इम्रान बाबू कुरेशी, ऑल इंडिया जमियतुल कुरेशचे प्रदेशाध्यक्ष हाजी मोहंमद अय्युब कुरेशी, युथ विंगचे प्रदेशाध्यक्ष अबू सोफियान कुरेशी, सचिव आकिफ हमीद कुरेशी, प्रदेश उपाध्यक्ष हाजी कदीर चौधरी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कलीम कुरेशी, इम्रान चौधरी, मोहंमद फजल कुरेशी, मराठवाडा अध्यक्ष असलम कुरेशी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष हाजी इसा कुरेशी, फय्याज कुरेशी, बिलाल कुरेशी, मो. फजल कुरेशी, गुलाम जिलानी मिसबाही यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कुरेशी समाजाच्या शैक्षणिक शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी हाजी यासीन कुरेशी, हाजी इस्माईल कुरेशी, हाजी शेख लाल कुरेशी, हाजी शरीफ कुरेशी, हाजी रज्जाक कुरेशी, आमद कुरेशी, कादर कुरेशी, खालेद कुरेशी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष असलम कुरेशी, परवेज चौधरी, हाजी वसीम चौधरी, सगीर कुरेशी, बाबा कुरेशी, जहीर कुरेशी, जावेद कुरेशी, गफ्फार कुरेशी, नासेर कुरेशी, सलीम चौधरी, मोईन कुरेशी, मुज्जू कुरेशी, राज़ेक कुरेशी, हनिफ कुरेशी, अझर कुरेशी, एकबाल कुरेशी, आसिफ कुरेशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद नूर कुरेशी यांनी केले तर आभार हाजी वसीम चौधरी यांनी मानले.

फोटो

Web Title: Qureshi community gathering in excitement