शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती; लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 13:17 IST

मंठा तालुक्यातील तळणी सर्कल मधील देवठाण्यातील प्रकार

तळणी (जि. जालना) : आ. बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे मंगळवारी देवठणा- उस्वद गावात प्रचारासाठी गेल्यानंतर काही जरांगे पाटील आंदोलन समर्थक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी लोणीकर समर्थकांनी त्या युवकांना शिवीगाळ केली.

परतूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरक्षण प्रश्नावर प्रमुख नेते ताक ही फुंकून पित असताना आ. बबनराव लोणीकरांनी आष्टी (ता. परतूर) येथील मराठा समाजाच्या संख्येबाबत केलेल्या वक्तव्यानंतर समाजातून रोष व्यक्त केला जात आहे. त्यात लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे प्रचारादरम्यान मंगळवारी देवठाणा-उस्वद गावात ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी संतप्त लोणीकर कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या उपस्थितीत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर लोणीकर समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत जरांगे पाटील समर्थकांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या. त्याचा व्हिडीओ ही समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, समाजाबाबत केलेले वक्तव्य लोणीकरांना भोवणार असल्याच्या भावनाही आता व्यक्त केल्या जात आहेत.

'त्या' व्हायरल व्हिडिओत नेमकं काय ?देवठाणा येथे प्रचारादरम्यान जरांगे पाटील समर्थकांनी राहुल लोणीकरांना आरक्षणाच्या प्रश्नांवरून सरबत्ती करतानाचा एक व्हिडीओ तर दुसऱ्या व्हिडिओत लोणीकर समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत जरांगे समर्थकांना बाजूला घेऊन शिवीगाळ केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

विधिमंडळात भूमिका मांडली : लोणीकरमराठा आरक्षणाबद्दल आ. लोणीकरांनी विधिमंडळात अधिकृत भूमिका मांडली आहे. आरक्षणावरून राजकारण करत लोकसभेत स्वार्थ साधलेल्या बीडचे खा. बजरंग सोनवणे व परभणीचे खा. संजय जाधव यांनी निवडणूक येताच कोणती भूमिका मांडली ? असाही प्रश्न यावेळी राहुल लोणीकर यांनी जरांगे समर्थकांना विचारला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकpartur-acपरतूरBabanrao Looneykarबबनराव लोणीकरBJPभाजपाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील