पथकासमोर शेतकऱ्यांकडून प्रश्नांचा भडिमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:23+5:302020-12-23T04:27:23+5:30
फोटो बदनापूर : केंद्रीय पथकाने मंगळवारी दुसऱ्या दिवशी रोशनगाव, कस्तूरवाडी (ता. बदनापूर) शिवारात नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. ...

पथकासमोर शेतकऱ्यांकडून प्रश्नांचा भडिमार
फोटो
बदनापूर : केंद्रीय पथकाने मंगळवारी दुसऱ्या दिवशी रोशनगाव, कस्तूरवाडी (ता. बदनापूर) शिवारात नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या.
तालुक्यात केंद्रीय पथकाने सोमवारी तीन गावशिवारांमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनी, पिके व अन्य बाबींची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता; परंतु मंगळवारी पुन्हा या पथकाने रोशनगाव, कस्तूरवाडी या शिवारात दौरा केला. यावेळी या पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यावेळी या शिवारातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे आमच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे चुकीचे झाल्याचा आरोप करून पिकविमा, अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे फेरपंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावेळी या पथकातील अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत विचारणा केली. या पथकाने सुखदेव हिवराळे यांच्या शेताची पाहणी केली, तसेच रोशनगाव-कस्तूरवाडी रोडवरील नाल्याचे पाणी शेतातून गेल्यामुळे शेत खरडून गेल्याचे सांगितले. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.