महिलेच्या हातातील पर्स चोरट्यांनी केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST2021-09-09T04:37:02+5:302021-09-09T04:37:02+5:30
सालगाव येथे हनुमान मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न परतूर : आरोपींनी संगनमत करुन हनुमान मंदिराच्या प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश ...

महिलेच्या हातातील पर्स चोरट्यांनी केले लंपास
सालगाव येथे हनुमान मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न
परतूर : आरोपींनी संगनमत करुन हनुमान मंदिराच्या प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना परतूर तालुक्यातील सालगाव येथे घडली. या प्रकरणी पोलीस पाटील बाबुराव केशवराव सालगावकर (पोलीस पाटील) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित गणेश तुळशीराम वाघ (३४, वाघपिंपरी ता. सेलू) व इतर दोन अनोळखी इसमांविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहेत.
धावडा येथून दुचाकी चोरीस
धावडा : कृषी सेवा केंद्रासमोर समोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील धावडा येथे घडली. या प्रकरणी दुकान मालक किशोर रतन वैरी (मालक, जय बजरंग कृषी सेवा केंद्र, धावडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन मोंढ्यात जुगार चालविणाऱ्यांवर गुन्हा
चंदनझिरा : चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवीन मोंढा भागात जुगार चालविणाऱ्या दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चंदनझिरा पोलीस ठाण्याचे रवि देशमुख यांनी केली आहे. निखील मदन खाकीवाले (संग्रामनगर, जालना), आकाश रमेश यादव (मंगळबाजार, जालना) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व आकडे घेतांनाचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत.