२६ हजार क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST2021-02-05T08:03:59+5:302021-02-05T08:03:59+5:30

तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता येथील जिनिंगवर कापूस खरेदी सुरू करण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी प्रयत्न केले होते. ...

Purchase of 26,000 quintals of cotton | २६ हजार क्विंटल कापसाची खरेदी

२६ हजार क्विंटल कापसाची खरेदी

तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता येथील जिनिंगवर कापूस खरेदी सुरू करण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर ३० नोव्हेंबर ते २९ जानेवारी या कालावधीमध्ये केवळ ३० दिवसात २६ हजार ५३३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला होता. ९८३ शेतकऱ्यांनी आपला कापूस सीसीआय केंद्रावर विक्रीसाठी आणला होता. कापूस नसल्याने कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. या केंद्रावर सीसीआयचे केंद्रप्रमुख म्हणून पवन बोबडे हे काम पाहत होते. यासाठी मार्केट कमिटीचे स्थानिक संचालक शिवाजी बोबडे, देवीलाल बजाज, नकुल भालेकर यांनी सहकार्य केले. तर मार्केट कमिटीचे सचिव विष्णूपंत बाहेकर, रामदास बोके, भाऊसाहेब बोबडे, जिनिंगचे गोरख राऊत यांनी कापूस केंद्र सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Purchase of 26,000 quintals of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.