पाणीपुरवठ्यासह सार्वजनिक शौचालयाचे काम मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST2021-02-14T04:28:48+5:302021-02-14T04:28:48+5:30

केदारखेडा : ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नूतन पदाधिकारी, सदस्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत पाणीपुरवठ्याला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर ...

Public toilet work will be started along with water supply | पाणीपुरवठ्यासह सार्वजनिक शौचालयाचे काम मार्गी लागणार

पाणीपुरवठ्यासह सार्वजनिक शौचालयाचे काम मार्गी लागणार

केदारखेडा : ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नूतन पदाधिकारी, सदस्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत पाणीपुरवठ्याला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणे, सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न मार्गी लावणे, बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध करणे आणि सक्तीने गाळे कराची वसुली करणे, आदी विविध ठराव घेण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी सरपंच सतीश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली नूतन ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा पार पडली. या मासिक सभेत नळयोजनेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणे, गाळेधारक भाडे वसुली सक्तीने करणे, खोल्यांची दुरुस्ती करणे, वीजवितरण केंद्राकडे, दूरसंचारकडे थकीत कर वसुलीसाठी पाठपुरावा करणे, पोखरा योजनेंतर्गत प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे, शहरी भागात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केदारखेडा येथून स्वतंत्र बससेवा सुरू करणे, जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक सुधारणा करणे, अंगणवाडीचा कारभार पारदर्शक करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम प्रस्ताव सादर करणे, आदी विकासात्मक ठराव घेण्यात आले. सरपंच सतीष शेळके, उपसरपंच पंडित जाधव, ग्रामसेविका के. एल. रोकडे, ज्योती विलास मोरे, वर्षा कृष्णा जाधव, वत्सला रतन जाधव, बाबासाहेब राऊत, ज्ञानेश्वर जाधव, सरसाबाई नामदेव कांबळे, कासाबाई उत्तम तांबडे, शारदा विलास काळे, गीता संतोष मैद यांची उपस्थिती होती.

सर्व ठराव अमलात आणणार

ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेतलेले सर्व ठराव आता कागदोपत्री राहणार नाहीत. ते ठराव अमलात आणले जाणार आहेत. गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण काम करणार असून, ग्रामस्थांचाही यात सहभाग महत्त्वाचा आहे.

सतीष शेळके

सरपंच, केदारखेडा

Web Title: Public toilet work will be started along with water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.