सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:35+5:302021-02-05T08:00:35+5:30
विरेगाव येथे गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भोकरदन : तालुक्यातील विरेगाव येथील सम्राट अशोक बौद्ध विहारात तथागत भगवान गौतम ...

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
विरेगाव येथे गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना
भोकरदन : तालुक्यातील विरेगाव येथील सम्राट अशोक बौद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची गुरुवारी प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्यात गौतम बुद्धांच्या १०० मूर्ती दान करण्याचा संकल्प जाधव कुटुंबाच्या वतीने यावेळी करण्यात आला. गावातून मिरवणूक काढण्यात आली. पुष्पा समाधान जाधव यांनी दान केलेल्या बुद्धांच्या मूर्तीची भिक्खू संघाच्या हस्ते विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी भदंत सारीपुत्र, भंते मोगलायन, भंते संघमित्र, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक यादवराव पगारे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, कमलकिशोर जोगदंडे, विशाल मिसाळ, नितीन जोगदंडे, समाधान जाधव, पुष्पा जाधव, भाऊसाहेब पिसे, सुनील पिसे, काशिनाथ पिसे, सुभाष दळवी, विष्णू पिसे, सुखदेव पगारे, रामकृष्ण पगारे, राधाकिसन सुरडकर, मोहन सुरडकर, सुभाष मस्के, विजय पगारे, पंडित पगारे, नामदेव पगारे, सोनाजी आरके, भगवान सुरडकर, बबन सुरडकर, एस.टी. साळवे, उमेश सुरडकर, सुनील पगारे आदींची उपस्थिती होती.