क्रीडासंकुलासाठी सहा कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:38+5:302021-01-19T04:32:38+5:30
देऊळगाव राजा : क्रीडासंकुलासाठी शासनाकडून सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, तो निधी लवकरच मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री ...

क्रीडासंकुलासाठी सहा कोटींची तरतूद
देऊळगाव राजा : क्रीडासंकुलासाठी शासनाकडून सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, तो निधी लवकरच मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
शिंगणे यांनी रविवारी शहरातील विठ्ठल-रुक्माई मंदिरकाम भूमिपूजन व क्रीडासंकुल कामाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंदखेड राजा व देऊळगाव राजा यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठोक निधी पाच कोटी रुपयांचा उपलब्ध करून दिला आहे. त्यातून अत्यावश्यक असलेली पाइपलाइन, नाल्यांची कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजयनगर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी डॉ. शिंगणे यांनी चक्क दुचाकीवरून या भागाची पाहणी केली. प्रामुख्याने घरकुलाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासह इतर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपण कोरोनावर यशस्वी मात करीत असून, लसीबाबत कोणीही गैरसमज पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शिवाजी देशमुख, अर्पित मिनासे, राजू शिरसाट, गणेश सवडे, हनीफ शहा, दत्ता काळे, सय्यद करीम, सुखदेव कोल्हे, गिरीश तिडके, राजेश सोनुने, नवनाथ गोमधरे, आसाराम वाघमारे, पवन डोईफोडे, विजय पाटील, भगवान यद्यनेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.