नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:19 IST2021-02-22T04:19:47+5:302021-02-22T04:19:47+5:30
देऊळगाव राजा : तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले असून, ...

नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या
देऊळगाव राजा : तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी माजी आ.डॉ.शाशिकांत खेडेकर यांनी केली.
माजी आ.डॉ.शाशिकांत खेडेकर यांनी देऊळगाव मही व गारखेड परिसरातील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांवर संकटांची मालकी सुरूच आहे. खरिपात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना रब्बीतून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती, परंतु ऐन हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी दीपक बोरकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादाराव खारडे, पंचायत समिती सदस्य भगवान खंदारे, अविनाश डोईफोडे, शिवानंद कुटे, संदीप राऊत, स्वप्निल शहाणे, तुळशीराम पंडित व शेतकरी बांधव उपस्थित होते.
===Photopath===
210221\21jan_30_21022021_15.jpg
===Caption===
देऊळगाव मही व गारखेड परिसरातील नुकसानीची पाहणी करताना माजी आ. खेडेकर