संरक्षक पाईप गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:22 IST2021-01-10T04:22:55+5:302021-01-10T04:22:55+5:30
काम संथगतीने जालना : शहरातील गैबनशहावाडी, अंबड रोड ते मंठा बायपास या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी या ...

संरक्षक पाईप गायब
काम संथगतीने
जालना : शहरातील गैबनशहावाडी, अंबड रोड ते मंठा बायपास या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधितांनी या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
पालकमंत्र्यांना निवेदन
वडीगोद्री : धाकलगाव येथील विविध समस्या सोडवाव्यात, अशी मागणी पालकमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर पोपट खंडागळे, बळीराम सव्वाशे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रस्ता कामाला प्रारंभ
भोकरन : शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील भूमिगत गटार योजना व सिमेंट रस्त्याच्या कामाला नगरसेवक रणवीरसिंह देशमुख यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या विकासकामांमुळे या भागातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
रस्त्याची दुरवस्था
जालना : शहरातील शनी मंदिर ते अंबड चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांची होणारी गैरसोय पाहता, संबंधित विभागाने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.