जिल्हा कोषागार कार्यालयात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:43+5:302021-02-05T08:02:43+5:30
नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई जालना : शहरातील विविध भागांत होणारी वाहतूककोंडी आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने ...

जिल्हा कोषागार कार्यालयात कार्यक्रम
नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
जालना : शहरातील विविध भागांत होणारी वाहतूककोंडी आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या महामार्गासह शहरांतर्गत बाजारपेठेतही ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवून वाहतूककोंडी सोडविणे गरजेचे आहे.
गुंज येथे श्री राम मंदिर निधी संकलन यात्रा
घनसावंगी : तालुक्यातील गुंज यथे श्रीराम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी निधी संकलन यात्रा काढण्यात आली. गावातील विविध मार्गावरून काढण्यात आलेल्या यात्रेचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी कौतिक देशमुख, अप्पासाहेब कंटुले, शरद चापकानडे, अशोक तौर, राहुल पवार, उमेश बोटे, सोमनाथ जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
उत्सव समिती अध्यक्षपदी कुरील
जालना : संत शिरोमणी रविदास जयंती उत्सव समितीची शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. या बैठकीत उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजन कुरील यांची निवड करण्यात आली, तर सचिवपदी संजय बन्सवाल, स्वागताध्यक्षपदी ॲड.दशरथ इंगळे यांची निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश कुरील, ॲड.डी.एस. सोनवणे यांची उपस्थिती होती.