पैठणीसाठी लागणाऱ्या रेशीम धाग्यांची जालन्यात निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:26+5:302021-08-25T04:35:26+5:30
जालना जिल्ह्यात घनसावंगी २३१, मंठा १४१, जालना १७०, परतूर १३५, अंबड १३४, बदनापूर ९१ आणि भोकरदन ३२, जाफराबाद २६ ...

पैठणीसाठी लागणाऱ्या रेशीम धाग्यांची जालन्यात निर्मिती
जालना जिल्ह्यात घनसावंगी २३१, मंठा १४१, जालना १७०, परतूर १३५, अंबड १३४, बदनापूर ९१ आणि भोकरदन ३२, जाफराबाद २६ अशी एकूण ९८० एकरवर तुतीची लागवड केली असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
सहा कोटींची नवीन इमारत
जालन्यात तत्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर तसेच माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ जालन्यात सुरू केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना एक हजार किलोमीटरचा कर्नाटकातील रामनगर येथील फेरा वाचला आहे. सध्या जालन्यात ही खरेदी बाजार समितीत होत आहे. असे असले तरी या बाजारपेठेसाठी सहा कोटी रुपयांची नूतन वास्तू तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही नवीन कोष खेरदीसाठीची इमारत मत्स्योदरी महाविद्यालयाजवळील परिसरात होत असल्याची माहिती अजय मोहिते यांनी दिली.