मोहळाई येथे राममंदिर निधी संकलनासाठी शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:11+5:302021-02-05T08:01:11+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथे गुरुवारी श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाला हनुमान मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. ...

मोहळाई येथे राममंदिर निधी संकलनासाठी शोभायात्रा
पारध : भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथे गुरुवारी श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाला हनुमान मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. निधी संकलनासाठी ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली होती. प्रभू श्रीरामच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
सकाळी ८ वाजता शोभायात्रेला सुरूवात झाली. शोभायात्रेत प्रत्येक घरातून निधी गोळा करण्यात आला. यावेळी प्रभू रामचंद्र की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले. शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल शिवाजी खेकाले, हभप विष्णू सास्ते, हभप. सागर महाराज, दत्ता वाघ, अविनाश वाघ, विजय पठाडे, एकनाथ नरवाडे, शिवाजी महाराज काकडे, सांडू पालकर, सरपंच सुरेश पालकर, सुखदेव पालकर, विष्णू पालकर, ज्ञानेश्वर पालकर, दिलीप पालकर, भागवत पालकर आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळी
मोहळाई येथे राममंदिर निधी संकलनासाठी शोभायात्रा काढण्यात आली होती.