एमआयडीसीत रस्त्यांचा प्रश्न गंभीर, खड्डे आणि अरूंदपणामुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST2021-02-18T04:56:26+5:302021-02-18T04:56:26+5:30

जालना येथील औद्योगिक वसाहतीचा दुसरा टप्पा परिसरातील रस्ते हे धोकादायक बनल आहेत. दुर्गाकाटा ते भाग्यलक्ष्मी स्टील या रस्त्यावर मेाठे ...

The problem of roads in MIDC is serious, traffic jams due to potholes and narrowness | एमआयडीसीत रस्त्यांचा प्रश्न गंभीर, खड्डे आणि अरूंदपणामुळे वाहतूक ठप्प

एमआयडीसीत रस्त्यांचा प्रश्न गंभीर, खड्डे आणि अरूंदपणामुळे वाहतूक ठप्प

जालना येथील औद्योगिक वसाहतीचा दुसरा टप्पा परिसरातील रस्ते हे धोकादायक बनल आहेत. दुर्गाकाटा ते भाग्यलक्ष्मी स्टील या रस्त्यावर मेाठे खड्डे पडले असून, अर्धा फुटांपर्यंत ते खोल आहेत. रात्री या भागात दररोजच अपघात होत आहेत. तसेच ट्रकची ये-जा वाढल्याने सध्या दिवसा आणि रात्री देखील या भागात ट्रकच्या रांगा लागून वाहतूकीची कोंडी होत आहे.

दोन वर्षापूर्वीच या रस्त्याची डागडूजी केली होती. परंतु अतिरिक्त लोड घेऊन जाणाऱ्या हेवी वाहतूकीचा परिणाम रस्ते खराब होण्यावर होत आहे.

या भागातील जिल्हा उद्योग केंद्र ते कालिका स्टील तसेच भाग्यलक्ष्मी स्टील चौक ते राजूरी, आयकॉन स्टीलसह गीताईकडे जाणाऱ्या रस्त्यांची रूंदी वाढविणे गरजेचे झाले असून, वाहतूक कोंडीचा फटका हा याभागातील उद्योजकांसह अन्य नागरिकांना सोसावा लागत आहे. या भागातील रस्ते एमआयडीसीने चांगले करावेत अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.

Web Title: The problem of roads in MIDC is serious, traffic jams due to potholes and narrowness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.