खरपुडी रोडवर कुंटणखान्यावर छापा
By Admin | Updated: July 10, 2017 00:39 IST2017-07-10T00:38:40+5:302017-07-10T00:39:56+5:30
जालना: घरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर छापा टाकून पोलिसांनी तीन महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेतले.

खरपुडी रोडवर कुंटणखान्यावर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना: घरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर छापा टाकून पोलिसांनी तीन महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेतले. येथील खरपुडी रोडवर रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
खरपुडी रोडवर एक महिला स्वत:च्या फायद्यासाठी घरात कुंटणखाना चालवत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी दुपारी सदर ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवला. तेव्हा संशयित महिलेच्या घरातील दोन खोल्यांमध्ये दोन महिला व दोन पुरुष आढळून आले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, कंडोम पाकिटे, असा २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह संशयित कृष्णा उत्तमराव बळप (३६, मात्रेवाडी) व गोविंद विजय लोणकर (२५,रा. तीर्थपुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, कल्याण आटोळे, अनिल काळे, काळेबाग, चव्हाण, गायकवाड, गुढेकर, पल्लवी जाधव, कांबळे आदींनी ही कारवाई केली.