मंत्री यांच्या मागणीची पंतप्रधान मोदींनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST2021-02-05T08:03:16+5:302021-02-05T08:03:16+5:30
जालना : परतूर शहरातील डॉ. स्वप्निल मंत्री यांनी रस्ता सुरक्षा व बेटी बचाव बेटी पढाव याबाबत ‘मन की बात’मध्ये ...

मंत्री यांच्या मागणीची पंतप्रधान मोदींनी घेतली दखल
जालना : परतूर शहरातील डॉ. स्वप्निल मंत्री यांनी रस्ता सुरक्षा व बेटी बचाव बेटी पढाव याबाबत ‘मन की बात’मध्ये माहिती देऊन जनजागृती करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत रविवारी मोदी यांनी डॉ. मंत्री यांनी केलेल्या मागणीनुसार या विषयावर मार्गदर्शन केले.
सध्या रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत शिवाय मुलींचा जन्मदरही कमी असून, ग्रामीण भागात आजही बालविवाह लावले जात आहेत. शिवाय मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. ही परिस्थिती पाहता परतूर येथील डॉ. स्वप्निल मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलद्वारे ‘मन की बात’ या कार्यक्रमात ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ व रस्ता सुरक्षा अभियानाबाबत माहिती देऊन जनजागृती करावी, अशी मागणी केली होती. तसेच त्याबाबत काही घोषवाक्येही पाठविली होती. डॉ. मंत्री यांच्या मागणीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात रस्ता सुरक्षा सप्ताहबाबत माहिती देऊन जनजागृती केली.