महावितरणमध्ये गुणवंत तांत्रिक कामगारांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:25+5:302021-08-20T04:34:25+5:30

जालना : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडल कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त उत्कृष्ट ...

Pride of quality technical workers in MSEDCL | महावितरणमध्ये गुणवंत तांत्रिक कामगारांचा गौरव

महावितरणमध्ये गुणवंत तांत्रिक कामगारांचा गौरव

जालना : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडल कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या औरंगाबाद परिमंडलातील ३२ तंत्रज्ञ व ७ यंत्रचालकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यात जालना जिल्ह्यातील १२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यावेळी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. अजय उकडगावकर यांनी आणीबाणीच्या प्रसंगी अत्यवस्थ व्यक्तीस 'सीपीआर' उपचार कसा द्यावा, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. गुणवंत तांत्रिक कर्मचारी पुरस्कार सोहळ्यास कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. मुख्य अभियंता भुजंग खंदारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अधीक्षक अभियंता संजय सरग, मोहन काळोगे, सतीश खाकसे, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, डॉ. अजय उकडगावकर, डॉ. यादव, कामगार विभागाचे अधिकारी अरविंद तेलवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात ३९ कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगार म्हणून गौरवण्यात आले. मेडिकव्हर रुग्णालयाच्या वतीने सर्व गुणवंत कामगारांना भेटवस्तू देण्यात आली. तसेच सर्व उपकेंद्रांना रुग्णालयाच्या वतीने प्रथमोपचार पेटीही भेट देण्यात आली. तसेच रुग्णालयाच्या वतीने महावितरण कर्मचाऱ्यांसाठी विविध तपासण्यांमध्ये सवलत देणाऱ्या गिफ्ट कार्डचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यात जालना मंडळातील पांडुरंग ठाकरे, सुनील घोरबांड, समाधान उकांडे, निवृत्ती चिकटे, बिभीषण शेळके, नाना जाधव, पंढरीनाथ बंगाळे, संतोष हुसे, बळीराम पवार, राजेंद्र मखमले, भरत नळगे, विशाल बावणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांनी केले. याप्रसंगी सहायक महाव्यवस्थापक चेतन वाघ, कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, महेश पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक चंद्रकांत खाडे, कनिष्ठ विधी अधिकारी सुनील पावडे, व्यवस्थापक अशोक पेरकर, वीज कामगार महासंघाचे परिमंडल सचिव वाल्मीक निकम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी

महावितरणच्या जालना मंडलातील गुणवंत कामगारांसोबत मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अधीक्षक अभियंता संजय सरग, मोहन काळोगे, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, उपव्यवस्थापक संजय खाडे.

Web Title: Pride of quality technical workers in MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.