शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विद्रोही साहित्य संमेलनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:06 IST

जालना येथे १४ व १५ मार्च असे दोन दिवस १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथे १४ व १५ मार्च असे दोन दिवस १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिध्द साहित्यिक आणि समीक्षक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. येथील शीतल गार्डनमध्ये हे संमेलन होणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संमेलनाविषयी माहिती देताना कार्यकारी संघटक किशोर ढमाले म्हणाले, परिवर्तनवादी चळवळीला गती देण्यासाठी या विद्रोही संमेलनाचे आयोजन गत पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात केले जाते. मराठवाड्यातील हे चौथे साहित्य संमेलन आहे. लोकवर्गणीतून या संमेलनाचे आयोजन केले जाते. शासन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ५० लाख अनुदान देत असले तरी तेथे केवळ भोजनावळी होतात, असा आरोपही ढमाले यांनी केला. या संमेलनात पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करून अन्याय- अत्याचाराला या संमेलनातून वाचा फोडली जाते. या संमेलनात आदिवासी समूहाला प्राधान्य देण्यात आले असून, त्यांचे सांस्कृतिक आणि पारंपरिक नृत्य हे या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.१४ मार्च रोजी ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. यात कवीसंमेलन, विविध विषयांवर परिसंवाद, गटचर्चा यासह अन्य प्रमुख कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ अधिकाधिक सक्षम व्हावी, या हेतूने आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेने या संमेलनास भरभरून प्रतिसाद दिला आहे. जालना येथील संमेलनही असेच ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनास महाराष्ट्रातून दोन हजार साहित्यप्रेमी उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांच्या निवास, भोजन आणि अन्य विषयांसंदर्भातील काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राम गायकवाड यांनी या संमेलनाच्या अनेक वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. संमेलनाध्यक्ष पाटील यांचा विविाध ठिकाणी नागरी सत्कार करण्यात येणार असून, जालन्यात १३ मार्च रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनात स्थानिक कवींसाठी स्वतंत्र संमेलन होणार आहे. बालमंच हे या संमेलनाचे स्वतंत्र दालन राहणार आहे. पथनाट्याच्या माध्यमातून ८ मार्च रोजी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जालन्यातील साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी कामगार नेते अण्णा सावंत, कार्यवाहक राजेश ओ. राऊत, स्वागताध्यक्ष विजय पंडित, बुलडाणा येथील प्रा. पी. एस. खिल्लारे, सुरेश खंडाळे, बाळासाहेब तणपुरे, राजू घुले आदींची उपस्थिती होती.आज देशात केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारे चुकीचे निर्णय घेऊन ते लादले जात आहेत. यावर सविस्तर मंथन या संमेलनात होणार असून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे भोजनावळ्यांना येथे स्थान राहणार नाही. येथे विचारांचे मंथन होऊन समाजाला एकप्रकारची दिशा देण्याचे काम संमेलनातून आम्ही करणार असल्याचे किशोर ढमाले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक