प्रमोद देशमुख यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:46+5:302021-01-03T04:31:46+5:30
‘चला संवाद साधूया’ या अनोख्या उपक्रमांतर्गत बरबडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ऑनलाइन मार्गदर्शनाची मालिका सुरू केली आहे. याअंतर्गत ...

प्रमोद देशमुख यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
‘चला संवाद साधूया’ या अनोख्या उपक्रमांतर्गत बरबडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ऑनलाइन मार्गदर्शनाची मालिका सुरू केली आहे. याअंतर्गत विविध क्षेत्रांतील प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आदी मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. मंगळवारी या मालिकेअंतर्गत रानमळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक प्रमोद देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी इंग्रजीविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी शब्दापासून वाक्यांची निर्मिती कशी करावी, हे अतिशय सुलभ पद्धतीने सांगितले. इंग्रजी वाक्ये बोलण्याचा सराव घेऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि सोप्या पद्धतीने सांगून विद्यार्थ्यांना बोलके करून त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित केला. यावेळी साक्षी हजारे, अजिंक्य सामाले, कल्याण गिऱ्हे, युवराज हजारे या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन संवाद साधला. यापुढेही अशा प्रकारे विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळींना आमंत्रित करून त्यांचा विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद घडवून आणला जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी गोडी निर्माण केली जाईल, असे मुख्याध्यापक नामदेव चव्हाण, गजानन वायाळ, स्वाती बनसोडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले.