शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर-मनोज जरांगे पाटील यांच्यात अंतरवाली सराटीमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा

By विजय मुंडे  | Updated: March 27, 2024 08:29 IST

मंगळवारी मध्यरात्री जवळपास दीड तास चर्चा, लाेकसभा निवडणुकीसह इतर बाबींवर बातचीत

विजय मुंडे, वडीगोद्री (जि.जालना): मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा की नाही, हे समाजाशी बोलून ३० तारखेला निर्णय घेण्याची भूमिका मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर माविआसोबत जागा वाटप अंतिम होत नसलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून जवळपास दीड तास चर्चा केली. लाेकसभा निवडणुकीसह इतर बाबींवर ही चर्चा झाली.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २४ मार्च रोजी समाजाची राज्यव्यापी बैठक घेवून चर्चा केली होती. गावा- गावातून उमेदवार देण्याऐवजी प्रत्येक मतदार संघातून एक अपक्ष उमेदवार द्यावा. त्यातही प्रत्येक जाती-धर्माचा उमेदवार द्यावा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला होता. सोबतच गावा-गावात समाजाची बैठक घेवून समाजाचा होकार किंवा नकार टक्केवारीत कळवा अपक्ष उमेदवार देण्याबाबत ३० तारखेला निर्णय घेवून असे जरांगे पाटील म्हणाले होते.मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला दोन दिवस जातात न जातात तोच वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. जवळपास दीड तास चाललेल्या या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा, लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.

 

  • भेट झाली म्हणजे सकारात्मक चर्चा: आंबेडकर

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीसह पुढील वाटचाल कशी करायची ? यासह इतर विषयांवर चर्चा झाली. संयुक्त निवडणूक लढायची का ? यावर मात्र वेळ येईल त्यावेळी सांगू. आम्ही भेटलो म्हणजे सकारात्मक चर्चा झाली, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

  • तर ताकदीने उतरेन : जरांगे पाटील

माझा राजकारणावर विश्वास नाही. समाजाने नाही म्हटले तर नाही आणि समाज हो म्हटला तर इतक्या ताकदीने उतरणार की त्यांनी मला आंदोलनात जितके हलक्यात घेतले होते तसे राजकारणात हलके घ्यायचे नाही. वंचितकडून प्रस्ताव आला असला तरी सर्व सूत्रे समाजाच्या हाती दिले आहेत. गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील. समाजाच्या म्हणण्यानुसार ३० तारखेला चित्रच स्पष्ट करू. गावा-गावातून अपक्ष उमेदवार देण्याबाबत निर्णय घेवू. माझा जन चळवळीवर विश्वास आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी