३६ तासानंतरही वीजपुरवठा खंडितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:57 IST2021-02-18T04:57:23+5:302021-02-18T04:57:23+5:30
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील बस स्टॅन्ड भागातील वीजपुरवठा ३६ तासानंतरही पूर्ववत झाला नव्हता. महावितरणकडे रोहित्र उपलब्ध नसल्याने ...

३६ तासानंतरही वीजपुरवठा खंडितच
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील बस स्टॅन्ड भागातील वीजपुरवठा ३६ तासानंतरही पूर्ववत झाला नव्हता. महावितरणकडे रोहित्र उपलब्ध नसल्याने गैरसोय कायम आहे. खंडित विजेमुळे या भागातील व्यापारी, ग्राहकांना एक ना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असून, महावितरणच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त होत आहे.
तळणी गावांची लोकसंख्या ५ हजार ७४७ असून, कुटुंबसंख्या १२०० आहे. तळणीत एकूण सात सिंगल फेजचे रोहित्र रोहित्र असून, एक थ्रीफ्रेज रोहित्र आहे. बस स्टॅन्ड भागाला थ्रीफ्रेज रोहित्रावरून वीजपूरवठा केला जाते. बस स्टॅन्ड भागात घरगुती व व्यवसायिक मीटरधारकाची संख्या मोठी आहे. दरमहा लाखो रुपयांची नियमित वीजबील वसुली होते. त्यानंतरही महावितरणकडून रोहित्रांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली जात नाही. सर्वच रोहित्र उघडे आहेत. तळणीला महिला लाईनमन असून 'त्या' खाजगी व्यक्तीकडून कामे करुन घेतात. महावितरणचे कनिष्ठ अभियंत्याकडून सक्तीची वसुली केली जाते. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आरोग्य सेवेवर परिणाम
तळणी बस स्टॅन्ड भागातील वीजुरवठा ३६ तासानंतरही खंडित असून, विजेवर आधारीत व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. दवाखान्यातील आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याचे एम.डी. माने यांनी सांगितले.
केबल जोडण्याचे काम सुरु
तळणी बस स्टॅन्ड भागातील रोहित्राचे केबल मंगळवारी जळाले होते. बुधवारी जालन्याहून केबल उपलब्ध झाले असून, दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे मंठा महावितरणचे कनिष्ठ अभियंता ए. एस. जगम यांनी सांगितले.