पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:46 IST2018-03-06T00:46:46+5:302018-03-06T00:46:51+5:30

भोकरदन तालुक्यातील पारध बू.येथे पिसाळलेल्या कुत्र्याने दोन शालेय विद्यार्थ्यांसह एका व्यक्तीला चावा घेतला. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

Pounded dog bite | पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा

लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बू.येथे पिसाळलेल्या कुत्र्याने दोन शालेय विद्यार्थ्यांसह एका व्यक्तीला चावा घेतला. सोमवारी सकाळी ही घटना घडली.
सकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील अदिती समाधान बोराडे (६) ही पहिल्या वर्गात शिकणारी मुलगी नदी रस्त्याने जात असताना पिसळालेल्या कुत्र्याने तिच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर काही वेळाने गणेश वाडीतील प्रभाकर क्षीरसागर (१२) हा घरासमोर खेळत असताना कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेऊन जखमी केले. बसस्थानकावर उभे किशोर भोरकडे त्यांच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला.
वर्षभरापासून पारध येथे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने कुत्र्याने तिघांना चावा घेतल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

Web Title: Pounded dog bite