शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

कारमधून तलवार नेणारा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:27 AM

कारमधून तलवार नेणाऱ्याविरूध्द चंदनझिरा पोलिसांनी कारवाई के

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कारमधून तलवार नेणाऱ्याविरूध्द चंदनझिरा पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई गुरूवारी सकाळी करण्यात आली असून, कारसह तलवार असा एकूण ७ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि शामसुंदर कौठाळे व त्यांचे सहकारी गुरूवारी सकाळी गस्तीवर होते. त्यावेळी पोलिसांची जीप पाहून एकाने त्याची कार (क्र.एम.एच.२१- ए.जी.६७७७) भरधाव वेगात पुढे नेली. पोलिसांना त्याचा संशय आल्याने पाठलाग करून त्याला नवीन जालना मोंढा येथे थांबविण्यात आले. कारची तपासणी केली असता आतमध्ये पिवळ्या धातूची मूठ असलेली लाल रंगाच्या कव्हरमध्ये ठेवलेली साडेतीन फूट लांबीची तलवार आढळून आली. चालक संतोष सुभाषलाल जैस्वाल (रा. इंदेवाडी ता. जालना) याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी तलवारीसह कार जप्त केली असून, या प्रकरणी पोलीस कर्मचारी अनिल काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संतोष जैस्वाल विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि सांडू पठाण हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोनि. एस. कौठाळे, पोउपनि प्रमोद बोंडले, पोउपनि सांडू पठाण, कर्मचारी अनिल काळे, गोविंद पवार, मच्छिंद्र निकाळजे आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीसArrestअटक