शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पळून गेलेल्या विवाहितेचे लग्नासाठी पोलिसांना साकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:10 IST

पैठण तालुक्यातून आतेभावासोबत पळून आलेल्या विवाहितेने चक्क भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी माझा विवाह करून देण्यासाठी चक्क पोलिसांनाच साकडे घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : पैठण तालुक्यातून आतेभावासोबत पळून आलेल्या विवाहितेने चक्क भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी माझा विवाह करून देण्यासाठी चक्क पोलिसांनाच साकडे घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.घटनेची माहिती अशी की, एका १९ वर्षीय तरूणीचे (कडेठाण ता. पैठण) येथील २५ वर्षीय तरुणा सोबत सहा महिन्या पूर्वी लग्न झाले होते. हे पती - पत्नी दोघेही कडेठाण येथे वास्तव्य करीत होते. मात्र १९ वर्षीय तरूणीचा जीव दुसरीकडेच गुंतलेला होता. त्यामुळे तिला कडेठाणमध्ये मन लागत नव्हते. तिचे ढोरकीण येथील आतेभावासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे ती नेहमी त्याच्या संपर्कात होती, शेवटी सोबत जगण्याच्या व सोबत राहण्याच्या घेतलेल्या आणाभाका तिला काही कडेठाण येथे राहू देत नव्हत्या. शेवटी १४ जानेवारी रोजी सदर विवाहित तरूणी तिच्या २५ वर्षीय आतेभावा सोबत कडेठाण येथून पळून जाण्याचा निर्णय घेऊन कठेठाण सोडले.परंतु आता कोठे जावे, काय करावे, विवाह कोठे करावा असे प्रश्न त्यांच्या समोर पडला होता, मात्र तिच्या आतेभावाचा मित्र भोकरदन तालुक्यातील मलकापूर येथे होता, हे दोघेही १४ जानेवारीला त्याच्या घरी आले व दोन दिवस मुक्काम केला. मात्र मित्राला त्याने ही तरूणी पळून आणल्याचा प्रकार कळल्यावर त्याने या प्रेमीयुगुलास १५ जानेवारी रोजी रात्री भोकरदन पोलीस ठाण्यात हजर केले. त्यावेळी सदर विवाहित तरूणीने आपला विवाह हा आपल्या सोबत असलेल्या आतेभावासोबतच करून द्यावा असा हट्ट धरल्याने पोलीसही अचंबित झाले. एका विवाहित मुलीचा दुसऱ्या सोबत विवाह कसा लावावा, हा त्यांच्यासमोर यक्षप्रश्न पडला होता. त्या तरूणीने निरीक्षक दशरथ चौधरी यांना सांगितले की माझ्या आई - वडिलांनी माझ्या मनाविरूध्द विवाह केला होता, ते पती मला पसंतनाही, तुम्ही माझा विवाह माझ्या आतेभावासोबत लावून द्यावा नंतरच आम्ही ठाणे सोडू असा हट्ट धरला. यावेळी निरीक्षक चौधरींनी त्यांची समजूत काढली. जोपर्यंत पतीसोबत घटस्फोट होत नाही, तोपर्यंत दुसरा विवाह करता येणार नाही असे सांगून, रात्रभर ठाण्यातच ठेवून घेतले. याची माहिती पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना देऊन ठाण्यात गुरूवारी बोलावून घेतले. यावेळी विवाहितेला त्यांच्या स्वाधीन केल्याची माहिती निरीक्षक चौधरी यांनी दिली. या प्रकाराने पोलीसही चक्रावून गेले होते.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसFamilyपरिवारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट