Police raid on gambling stand | जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना - राजूर रोडवरील वेअर हाऊसच्या पाठीमागे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांनी रविवारी छापा मारून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. शेख ताहिरोद्दीन शेख अमीनोद्दीन (रा.चंदनझिरा), शेख शाहरुख शेख शाहनूर (२२. रा. हनुमानगर), सय्यद जहाजिर सय्यद पाशा (३५, रा. देहकरवाडी), शेख अनवर शेख गुलाब (३०, रा. वाल्मीकनगर), सय्यद जावेद सय्यद जानेमीया (३५, रा. लालबाग) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपिंची नावे आहे.
जालना - राजूर रोडवर पेट्रोल्ािंग करत असतांना पोनि. शामसुंदर कौटाळे यांना खब-यामार्फत माहिती मिळाली की, जालना - राजूर रोडवरील वेअर हाऊसच्या पाठीमागे तिर्रट नावाचा जुगार काही जण खेळत आहे. या माहितीवरुन सदरील ठिकाणी पोलिसांनी छापा मारुन पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८१० रुपये नगदी व रंगीबेरंगी पत्त्याचे ४ कॅट जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शामसुंदर कौठाळे, पोउपनि प्रमोद बोंडल, पठाण, कर्मचारी नंदलाल ठाकूर, अनिल काळे, चद्रंकात माळी, परमेश्वर हिवाळे यांनी केली आहे.


Web Title: Police raid on gambling stand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.