५० हजार रूपये लंपास करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:43+5:302021-07-08T04:20:43+5:30

मुलाचे लग्न असल्यामुळे औरंगाबाद येथून एक महिला जालना येथे खरेदीसाठी आली होती. त्यांच्या नजर ठेवून असलेल्या दोन महिलांनी ...

Police caught those who stole Rs 50,000 | ५० हजार रूपये लंपास करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले

५० हजार रूपये लंपास करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले

मुलाचे लग्न असल्यामुळे औरंगाबाद येथून एक महिला जालना येथे खरेदीसाठी आली होती. त्यांच्या नजर ठेवून असलेल्या दोन महिलांनी त्यांच्याजवळील ५० हजार रूपये लंपास केले. याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल परशुराम पवार यांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तोंडी तक्रारीवरून महिला आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी महिला या ऑटोरिक्षाने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० हजार रूपये रोख जप्त करण्यात आले. सदर रक्कम महिलेकडे सुपूर्द करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल कमल गिरी व महिला पोलीस नाईक सिंधू खर्जुले यांनी केली आहे.

Web Title: Police caught those who stole Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.