शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

३० लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:00 IST

जाफराबाद पोलीसांनी देऊळझरी येथील पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ७ जणांविरुध्द धडक कारवाई करुन ३० लक्ष ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ९ आरोपी विरुद्ध बुधवारी रात्री ऊशीरा जाफराबाद पोलिसात गुन्हा दाखल केला

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद पोलीसांनी देऊळझरी येथील पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ७ जणांविरुध्द धडक कारवाई करुन ३० लक्ष ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ९ आरोपी विरुद्ध बुधवारी रात्री ऊशीरा जाफराबाद पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जाफराबाद तालुक्यात वाळू हा चर्चेचा विषय असला तरी याबाबत अनेक तक्रारी असताना सुद्धा कारवाई होत नाही. मात्र बुधवारी अचानक विना परवाना अवैध वाळू चोरी करणाºयांविरुद्ध पोलिसांनी ही कारवाई केली आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबादचे सहायक पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे, परीविक्षाधिन पोलीस निरी क्षक एन.के. काकरवाल यांनी देऊळझरी शिवारातील पूर्णा नदी पात्रात गुप्त मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप जंजाळ, रा. कुंभारी, महेंद्र वायाळ, रा. सावरखेडा गोंधन, उमेश इंगळे रा. देऊळझरी, नितीन शेवत्रे, रा. ब्रह्मपुरी, विठ्ठल मुळे, रा. जवखेडा ठेंग, गणेश मोरे, रा. कुंभारी, प्रभाकर जंजाळ, रा. कुंभारी या ट्रँक्टर चालकांविरुध्द विना क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली, रॉयल्टीची पावती नसताना अवैध वाळू विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाताना, सोबत वाहन चालविण्याचा परवाना नसतांनाही वाहतूक करताना दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी पकडले. त्यांच्याविरुध्द जाफराबाद पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.ही कारवाई पोहेकॉ. बी. टी. सहाणे, एम. आर. सोळंके, एम. पी. बावरे, डी. बी. चव्हाण, एस. यु. तिडके, आर. व्ही. मोरे व पो.काँ सुरडकर यांनी केली.

 

टॅग्स :PoliceपोलिसsandवाळूCrime Newsगुन्हेगारी