शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोकलेनने जलवाहिनी निखळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:09 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पैठण रस्त्याचे रूंदीकरण करतांना पोकलेनचा धक्का लागल्याने जलवाहिनीतील काही पाईप निखळल्याने मोठी अडचण निर्माण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पैठण रस्त्याचे रूंदीकरण करतांना पोकलेनचा धक्का लागल्याने जलवाहिनीतील काही पाईप निखळल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या जलवाहिनीची दुरूस्ती युध्द पातळीवर हाती घेण्यात आली असून, या घटनेमुळे जुना जालना शहराला चार दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.गेल्या महिन्याभरात जालना शहराला पाणीपुरवठा करणा-या जलवहिनी फुटण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही अशी गळती लागली होती. आता तर पोकलेनच्या धक्का लागल्याने जलवाहिनीचे पाईप निखळले आहेत. यामुळे मोठे पाणी वाया गेले. परंतु लगेचच जालना पालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पैठण येथून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, या तांत्रिक घटनेमुळे नागरिकांना चार ते पाच दिवस होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले आहे. ही दुरूस्ती करण्यासाठी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, पाणीपुरवठा सभापती पूनम स्वामी आणि अभियंते यावर लक्ष ठेवून असल्याचेही नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सांगितले.

टॅग्स :civic issueनागरी समस्याWaterपाणीJalana Muncipalityजालना नगरपरिषद