घुंगर्डे हादगाव येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:16+5:302021-05-16T04:29:16+5:30

तीर्थपुरी : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने गावात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वड, पिंपळ, लिंब, ...

Plantation at Ghungarde Hadgaon | घुंगर्डे हादगाव येथे वृक्षारोपण

घुंगर्डे हादगाव येथे वृक्षारोपण

तीर्थपुरी : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने गावात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वड, पिंपळ, लिंब, करंज, बेल, जांभळ, अशोक आदी जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.

गावातील मंदिर परिसर, रस्त्याच्या बाजूला, स्मशानभूमी आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक माऊली दोबोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची गरज भासत आहे. म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने आपापल्या गावात झाडे लावावी, असे आवाहन पोनि बल्लाळ यांनी केले. याप्रसंगी सरपंच भरत काळेे, उपसरपंच कृष्णासिंग पवार, बाबासाहेब मुळे, डॉ. मोतेकर, दिलीप कोळेकर, बाबासाहेब चोरमले, कारभारी ढाले, भीमराव थोरात, पांडुरंग खापरे, उद्धव चव्हाण, त्रिंबक भद्रे, भाऊसाहेब खापरे, सचिन चोरमले, संग्रामसिंग पवार, अशोक पवार, संतोष काकडे, आयुब शेख, भगवान जाधव, कबीर पवार, सोमनाथ तळतकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Plantation at Ghungarde Hadgaon