गुलाबी थंडीत तापू लागला प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST2021-01-08T05:40:04+5:302021-01-08T05:40:04+5:30
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचार गुलाबी थंडीत चांगलाच तापू लागला आहे. चिन्ह वाटपानंतर आरोप- प्रत्यारोपांच्या ...

गुलाबी थंडीत तापू लागला प्रचार
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचार गुलाबी थंडीत चांगलाच तापू लागला आहे. चिन्ह वाटपानंतर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून, प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ज्येष्ठांसह युवकांनीही चांगलीच आघाडी घेतली आहे.
घनसावंगी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पारडगाव येथील ग्रामविकास पॅनलने गुरुवारी प्रचारास प्रारंभ केला. पारडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या १३ सदस्य निवडीसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात प्रभाग क्रमांक पाचमध्ये ओबीसी महिला कुरेशी सईदाबी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता ३९ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. सत्ताधारी, विरोधकांनी निवडणूक प्रचारात रान उठविले आहे. सत्ताधारी केलेल्या कामांची तर विरोधक गावातील समस्यांची मांडणी करीत आहेत. अनेकांनी सोशल मीडियाचा वापर करीत प्रचाराची यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: युवा पिढी यात अधिक जोर लावत असल्याने निवडणूक प्रचारात रंगत आली आहे. आता मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे निवडणूक निकालानंतर समोर येणार आहे.