फोटोच्या महत्वाच्या बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:25+5:302021-01-08T05:41:25+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी भोकरदन : भोकरदन येथील लोकमान्य सार्वजनिक वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ...

फोटोच्या महत्वाच्या बातम्या
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
भोकरदन : भोकरदन येथील लोकमान्य सार्वजनिक वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संचालिका सुशीला खरात यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष जी.व्ही. देशमुख, उपाध्यक्ष संतोष इंगळे, संचालक प्रा. प्रकाश वाघ, विजय जैन, कैलास पवार आदींची उपस्थिती होती.
फोटो
संतुकराव खोमणे महाविद्यालयात अभिवादन
जालना : कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रा. अश्विनी क्षीरसागर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्षा प्रा. अश्विनी क्षीरसागर, प्रा. चंद्ररेखा गोस्वामी, प्रा. स्वाती पुराणिक, प्रा. मेघना पत्की, प्रा. गजानन कदम, अंकुश जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.