लोकमत न्यूज नेटवर्कजालना : श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या इतिहासाला खरा न्याय मिळू शकला नसल्याची खंत पेशवे अभ्यासक अॅड. विलास कुलकर्णी यांनी व्यक्त केली. शहरातील पेशवे स्मारक येथे रविवारी सायंकाळी बाजीराव पेशवे यांच्या २७९ पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी सरकारी अभियोक्ता अॅड. दीपक नाईक, सचिन देशपांडे, अॅड. सुनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, बाजीराव फक्त ४० वर्षे जगले आणि त्यात ४१ लढाया लढून अजिंक्य ठरले. हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे आणि आपल्या तलवारीचा डंका हिंदुस्थानात गाजवणारे श्रीमंत बाजीराव होते. ते उपेक्षित का? त्यांच्या इतिहासाची योग्य मांडणी करून खरा इतिहास जगासमोर येईल तेव्हाच त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला योग्य तो न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अॅड. दीपक नाईक, अमोल पाठक, अमित कुलकर्णी यांनी बाजीरावांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. यावेळी सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, कृष्णा दंडे, प्रथमेश कुंटे, शंभू मांडे, शुभम देशमुख, सुयोग कुलकर्णी, सखाराम हिवरेकर, राम हिवरेकर, कौस्तुभ संगमुळे आदींची उपस्थिती होती.तत्पूर्वी जुना जालना भागातील देहेडकरवाडी परिसरात पेशवे चौक आहे. या चौकांमध्ये सायंकाळी पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. बाजीरावांकडे एक युध्दकुशल राजा म्हणून पाहणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवून त्यांना बदनाम केले जात आहे.
पेशव्यांच्या इतिहासाला न्याय मिळणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:30 IST