इंग्लिश स्कूलमधील शिक्षकांना मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST2021-03-09T04:33:44+5:302021-03-09T04:33:44+5:30
भोकरदन - राज्यातील इंग्रजी माध्यमच्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने मानधन द्यावे, मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेली ...

इंग्लिश स्कूलमधील शिक्षकांना मानधन द्या
भोकरदन - राज्यातील इंग्रजी माध्यमच्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने मानधन द्यावे, मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेली आरटीईची थकबाकी तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) च्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले.
शैक्षणिक वर्षे २०२०-२१ साठी शाळेचे शासकीय कर व वीजबिल शुल्क माफ करावे, शालेय शुल्काबाबत मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अमंलबजावणी न झाल्याने शिक्षक भयभीत झाले आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मेस्टाचे प्रदेशाध्यक्ष संजय तायडे यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक रवींद्र दाणी, तालुकाध्यक्ष सोपान सपकाळ, उपाध्यक्ष कृष्णा पाबळे, प्राचार्य बी.एम. तांबारे, गजानन जाधव, डी.के. बकाल, गजानन बुलगे, शेख अझर, मनोज शास्त्री, नागेश घुगे, अमित थारेवाल, अभिजित थारेवाल, वाय.एस. भावसार, आयेशा पठाण, ज्योती सपकाळ, रावसाहेब ढवळे, एस.एन. जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
080321\08jan_22_08032021_15.jpg
===Caption===
भोकरदनच्या गटशिक्षणाधिकार्यांना निवेदन देताना पदाधिकारी