पाटोळे यांची मराठवाडा सचिवपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:35 IST2021-08-18T04:35:43+5:302021-08-18T04:35:43+5:30

शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे मराठवाडा सचिव बाबासाहेब पाटोळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ...

Patole elected as Marathwada Secretary | पाटोळे यांची मराठवाडा सचिवपदी निवड

पाटोळे यांची मराठवाडा सचिवपदी निवड

शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे मराठवाडा सचिव बाबासाहेब पाटोळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चंद्रकला गवळी, तालुकाध्यक्षा कमल भारसाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत कासाबाई शिरगुळे यांची मराठवाडा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बाबासाहेब पाटोळे यांची मराठवाडा सचिवपदी, रमेश दाभाडे यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी, सर्जेराव पाटोळे यांची जिल्हाध्यक्षपदी, नारायण खंदारे यांची बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी, बळीराम गोफणे यांची जाफराबाद तालुकाध्यक्षपदी, राजेश कांबळे यांची बदनापूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, मंठा तालुकाध्यक्षपदी कविता सपकाळ, बदनापूर तालुकाध्यक्षपदी रंजना कांबळे, देऊळगावराजा तालुकाध्यक्षपदी निकाळजे, जालना तालुका सचिवपदी छबूराव पाटोळे, तालुका उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वाघमारे, तालुका उपाध्यक्षपदी रमाबाई डोईफोडे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Web Title: Patole elected as Marathwada Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.