रेल्वे दलाच्या जवानामुळे प्रवाशाचा जीव वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:03 IST2017-12-05T00:03:23+5:302017-12-05T00:03:32+5:30
धावत्या रेल्वेत चढताना पाय निसटल्याने खाली पडलेल्या प्रवाशाचा रेल्वेच्या जवानामुळे जीव वाचला. जालना रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

रेल्वे दलाच्या जवानामुळे प्रवाशाचा जीव वाचला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : धावत्या रेल्वेत चढताना पाय निसटल्याने खाली पडलेल्या प्रवाशाचा रेल्वेच्या जवानामुळे जीव वाचला. जालना रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
नांदेड येथून देवगिरीने पुण्याला चालेले विठ्ठल नामदेव सरपाते (५५रा. भोसी, जि. नांदेड) जालना स्थानकावर पाणी पिण्यासाठी उतरले. त्यानंतर सरतापे यांनी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाय घसरुन ते प्लॉटफार्मच्या खाली पडले. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे काँस्टेबल एम. रशीद यांनी त्यांना वाचवले. यात सरपाते जखमी झाले. सरतापे यांना रुग्णालयात हलविण्यात आले.