शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्यानेच मामाच्या मदतीने चुलतीचा केला खून, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 20:18 IST

घटना परतूर तालुक्यातील आंबा येथे मंगळवारी उघडकीस आली.

परतूर : पुतण्यानेच मामाच्या मदतीने लाकडी दांड्याने मारहाण करून चुलतीचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील आंबा येथे मंगळवारी उघडकीस आली. मंगलबाई सुखदेव जाधव (४५) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सुखदेव जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित कैलास भुगाजी जाधव (रा. आंबा, ता. परतूर) व त्याचा मामा बंडू (पूर्ण नाव माहीत नाही) या संशयितांविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबा येथील गवळी गल्लीत राहणारे सुखदेव माणिक जाधव यांचा दूध व दहीविक्रीचा व्यवसाय आहे. या कामात त्यांची पत्नी मंगल जाधव या पतीला मदत करतात. मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुखदेव म्हशीचे दूध काढत असताना त्यांचा पुतण्या कैलास उर्फ पिंट्या मुगाजी जाधव याने घरी येऊन सुखदेव यांना शिवीगाळ केली. तेव्हा गावातील काही लोकांनी वाद मिटविला. नंतर सुखदेव व त्यांची पत्नी मंगल हे दोघे नेहमीप्रमाणे परतूर येथे दूध, दही विक्री करण्यासाठी गेले.

सुखदेव हे आंबा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या मुलीस घेऊन ११ वाजेच्या सुमारास घरी परतले. तेव्हा पुतण्या कैलास जाधव व त्याचा मामा बंडू हे घरी आले. बंडू याने माझ्या भाच्यास शिवीगाळ का केली, असे म्हणत दोघांनी सुखदेव यांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या सुखदेव यांनी त्यांच्यापासून कशीबशी सुटका करत काही अंतरावर असलेल्या तळ्याकडे धाव घेतली. दरम्यान, ११:३० वाजेच्या सुमारास सुखदेव यांची पत्नी मंगल जाधव या परतूरहून दूध, दही विक्री करून परत घराकडे येत होत्या.

आंबा येथील तळ्याजवळ कैलास जाधव व बंडू या दोघांनी मंगलबाई यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. वर्मी घाव बसल्याने मंगलबाई यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच परतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. या प्रकरणी सुखदेव जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित कैलास मुगाजी जाधव व त्याचा मामा बंडू (पूर्ण नाव नाही) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित फरार असून, पुढील तपास उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाDeathमृत्यूpartur-acपरतूर