आईच्या सोंगाने पंचमीची उत्साहात सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:59 IST2018-03-14T00:59:25+5:302018-03-14T00:59:29+5:30
पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या टेंभुर्णी येथील पंचमीची मंगळवारी भंद्या आईच्या सोंगाने सांगता झाली.

आईच्या सोंगाने पंचमीची उत्साहात सांगता
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या टेंभुर्णी येथील पंचमीची मंगळवारी भंद्या आईच्या सोंगाने सांगता झाली.
मागील गुरूवारपासून येथे दररोज रात्री विविध देवदेवतांचे सोंगे काढण्यात येत होती. सोमवारी व मंगळवारी पहाटे निघणा-या आईच्या सोंगांना विशेष महत्त्व असते. हे सोंग कलगी व तुरा दोन्ही गटांकडून स्वतंत्र काढले जातात.
सोमवारी निघालेले टोपवाल्या आईचे सोंग कलगी गटाकडून राहूल देशमुख यांनी तर तुरा गटाकडून विजय खांडेभराड यांनी घेतले होते. मंगळवारी निघालेले मानाचे भंद्या आईचे सोंग कलगी गटाकडून ज्ञानेश्वर भागवत यांनी तर तुरा गटाकडून नितीन आवटी यांनी घेतले.
यावेळी दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. आई भवानी की जय च्या गजराने संपूर्ण गाव निनादून गेले. सायंकाळी गावच्या गल्लोगल्लीत गवळणींच्या फुगड्या रंगल्या.