लोकसहभागातून पाणंद रस्त्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST2020-12-30T04:40:24+5:302020-12-30T04:40:24+5:30
वडीगोद्री- जालना राष्ट्रीय महामार्ग ते मच्छिमारी कॅम्प याला जोडणा-या २ किलोमीटर पाणंद रस्त्याचे काम भारतीय जैन संघटना यांनी दिलेल्या ...

लोकसहभागातून पाणंद रस्त्याचे काम
वडीगोद्री- जालना राष्ट्रीय महामार्ग ते मच्छिमारी कॅम्प याला जोडणा-या २ किलोमीटर पाणंद रस्त्याचे काम भारतीय जैन संघटना यांनी दिलेल्या जेसीबी मशीनमध्ये लोक वर्गणीतून डिझेल टाकून केले जात आहे. हे काम पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
वडीगोद्री- जालना राष्ट्रीय महामार्ग ते मच्छिमारी कॅम्प दरम्यान असलेल्या या शिवरस्त्याची मागील काही दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली होती. त्यामुळे शेतकºयांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यावर मार्ग काढण्यासाठी शेतक-यांनी लोकवर्गणी करून पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्त्याचे काम सुरू केले आहे. दोन पिढ्यांनंतर होत असलेल्या या रस्ते कामामुळे परिसरातील शेतक-यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या पाणंद रस्त्यासाठी राधाकिसन मैंद, भागूजी मैंद, आबासाहेब मैंद, अंबादास मैंद, राधाकिसन तळेकर, लक्ष्मण तळेकर यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी राहुल मैंद, वैभव मैंद, शिवम शहापूरकर, वरद मैंद, शरद रत्नपारखे, गणेश जोशी, बळीराम सव्वाशे, आकाश सव्वाशे आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ : वडीगोद्री- जालना राष्ट्रीय महामार्ग ते मच्छिमारी कॅम्प या पाणंद रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थिती शेतकरी.