आमच्या अंगावर कोणी आले, तर आमच्या शिवसैनिकरूपी वाघांच्या नखांसोबत सामना करावा लागेल, असा इशारा राज्यमंत्री तथा जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी बदनापूर येथे दिला. ...
येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे (रजिस्ट्री) मुख्य सर्व्हर संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रजिस्ट्रीच्या कामांचा खोळंबा होत आहे. रजिस्ट्रीसाठी येथे येणा-या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत असून, दिवसभरात केवळ ४० जणांची नोंदणी झाली. ...
जिल्ह्यात २८ जानेवारी व ११ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, या मोहिमेमध्ये शून्य ते पाच वयोगटातील एकही बालक लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहे. ...
मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयात आयोजित कै. रावसाहेब टोपे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत सांघिक विजेतेपदाचे प्रथम पारितोषिक नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाने मिळविले. ...
उत्पादक कंपन्यांनी पाणी पाकिटांची योग्य विल्हेवाट लावावी. अन्यथा प्लॅस्टिक कॅरीबॅग वापर व विक्री अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बुधवारी आठ कंपन्यांना बजावल्या आहेत. ...