पोलीस भरती प्रक्रियेसाठी केवळ बारावी उत्तीर्णची अट असताना चक्क संगणक अभियंते, प्राध्यापक व बी.टेक. झालेल्या उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेत लेखी परीक्षेला हजेरी लावली. ...
कायदे मंडळ कायदे निर्माण करण्याचे काम करते. न्यायालयाने कायद्यावर भाष्य करून फेरफार करणे योग्य नाही, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. येथील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान उद्घाटन ...
आदर्श ग्रामसंसद योजनेंतर्गत तालुक्यातील अंबा हे गाव पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दत्तक घेतले आहे. गत अडीच वर्षांत गावात विविध योजनांतून सव्वा कोटींचा निधी मिळाला असून, याद्वारे अनेक विकास कामे झाल्यामुळे गावाचे रुपडे पालटले आहे. ...
परभणी व पूर्णा शहराच्या पाणी टंचाई निवारणार्थ निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात आल्याने धरणातील जलसाठा घटला आहे. तीन वेळेस पाणी सोडण्यात आल्यामुळे धरणात आता केवळ ४२ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. ...
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. ...
बाजार वाहेगाव या गावाची आमदार आदर्शग्राम योजनेत निवड झालेली आहे. आ.नारायण कुचे यांनी दत्तक घेतलेल्या या गावात विकास आराखड्याच्या पलिकडे काहीही होऊ शकलेले नाही. ...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. शासन सेवेतल्या २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी या प्रमुख मागणीचे निवेदन संघटनेच्या पदाधिका-यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांन ...
भाजपा सरकारने चार वर्षात सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, बेरोजगार, व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. या फसव्या आणि घोषणाबाज सरकारला खाली खेचण्यासाठी जनतेने कॉगे्रसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. ...
माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करणाऱ्या कामगारांचे प्रतिमाह मानधन वेळेत देण्यात यावे, असे निर्देश राज्यस्तरीय पथकाने शनिवारी संबंधित विभागाला दिल्या. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. ...