पान दोनचा पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:10+5:302021-01-08T05:42:10+5:30
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील गायरान जमिनीवर उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राचे काम तीन वर्षापासून रेंगाळले असून, परिसरात ...

पान दोनचा पट्टा
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील गायरान जमिनीवर उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राचे काम तीन वर्षापासून रेंगाळले असून, परिसरात विजेचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. शेतकरी व ग्राहक त्रस्त झाले आहे. तीन वर्षापूर्वी या केंद्राचे थाटात उद्घाटन होऊनही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. या उपकेंद्राचे तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी तुकाराम चंडोल, अनिल चंडोल, अशोक पवार यांनी केली.
दाभाडी परिसरात कडाक्याची थंडी
जालना : बदनापूर तालुक्यातील दाभाडी परिसर गेल्या दोन दिवसापासून धुक्यात हरवला आहे. दाभाडी परिसरात ढगाळ वातावरणानंतर पाऊस झाला. आता धुके पडू लागले आहे. त्याचबरोबर कडाक्याची थंडीही वाढली आहे. यंदा अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. आता दाट धुके पडत आहे. हे धुके पिकांना धोेकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रेल्वे संघर्ष समितीचे केंद्रीय पथकाला निवेदन
जालना : जालना- खामगाव या नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. या मार्गाला तातडीने मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय पथकाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर गणेशलाल चौधरी, उपाध्यक्ष सुभाषचंद्र देविदान, महासचिव फेरोजअली, रमेश अग्रवाल, अशोक मिश्रा, ॲड. कुलकर्णी, मनोहर तलरेजा, बाबूराव सतकर, गेंदालाल झुंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पर्यवेक्षक जगताप सेवानिवृत्त
जालना : जेईएस कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक टी.आर. जगताप नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे विभागीय सचिव बी.बी. गौड, बी.जी. सोळुंके, सचिव शेख अब्बास, उपाध्यक्ष अशोक झिने, कोषाध्यक्ष महेश लोंकलकर, उपाध्यक्ष गणेश जाधव, शाम राठोड, विलास खऱ्वडे, राजेश एंगाटे, राजेंद्र ठोंबरे, पुरूषोत्तम दायमा, नवनाथ गिते आदींची उपस्थिती होती.
अंजानीआई फाउंडेशनला पुरस्कार
जालना : अंजानीआई फाउंडेशन जालना शहरात वयोवृध्दांसाठी कार्य करत आहे. फाउंडेशनकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. या कार्याची दखल घेऊन नांदेड येथील कल्याणी एज्यूकेशन सोशल वेलफेअर सोसायटीने फाउंडेशनला स्त्री भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ज्योती आडेकर, विद्या जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्या केंद्र सुरू करणार
जालना : जिल्ह्यात जास्तीत-जास्त समाज विद्या केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष हस्तीमल बंब यांनी दिली. भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.