पान दोनचा पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST2020-12-22T04:29:00+5:302020-12-22T04:29:00+5:30
जाफराबाद : जाफराबाद येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.एम. पाटील, धोंडीराम कऊटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय ...

पान दोनचा पट्टा
जाफराबाद : जाफराबाद येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.एम. पाटील, धोंडीराम कऊटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय बोर्डे, डॉ. उमाकांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा खासगाव येथील विद्यार्थ्यांना स्वच्छता, पोषण आहार, वाढ व विकास आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
दुभाजकांमध्ये कचरा
जालना : शहरात सिमेंट रस्ते तयार करण्यात आल्यानंतर दुभाजकांची निर्मिती करून यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. या दुभाजकांमध्ये काही नागरिक आपल्या दुकाने व घरातील कचरा आणून टाकत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. अशा नागरिकांवर कारवाईची मागणी होत आहे.
प्रदीप मठपती यांना पुरस्कार
जालना : येथील प्रदीप मठपती यांना एलआयसीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे जिल्हा सचिव परमेश्वर साळवे, महादेव लांडगे, अशोक नागरे, अनंत कणकुटे, नरसिंग बिराजदार, प्रदीप कांबळे राठोड, तुकाराम शेळके आदींची उपस्थिती होती.
आष्टी येथे गाडगे महाराज यांना अभिवादन
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील प्रियदर्शनी इंग्लिश स्कूलमध्ये रविवारी थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात, मदनलाल सिंगी, भागवत थोरात, माउली गुंजकर, भगवान भागवत, जगन भागवत, बाबू भागवत, भास्कर भागवत, सतीश आगळे, पवन वाघमारे आदींची उपस्थिती होती.
दिवसाढवळ्या वन्यप्राण्यांचा वावर
वालसावंगी : जाळीचादेव (ता. भोकरदन) येथे दिवसाढवळ्या वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जाळीचादेव परिसर जंगलाचा परिसर आहे. यामुळे या भागात अनेक हिंस्त्र प्राणी सातत्याने दिसत असतात. काही दिवसांपूर्वी दररोज रात्री मंदिर परिसरात अस्वलाचा वावर असायचा यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते. याबाबत वनविभागाला कळवूनसुद्धा दुर्लक्ष केले जाते.
कृषी विज्ञान केंद्रातर्फे तूर पिकाबाबत मार्गदर्शन
जालना : हडप सावरगाव येथे खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने तूर शेती दिन कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. कार्यक्रमाला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प संचालक डॉ. सूर्यकांत पवार, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्रीकृष्ण सोनुने, पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. हनुमंत आगे, राहुल चौधरी, नितीन घुगे, मंडळ कृषी सहायक वानखडे आदींची उपस्थिती होती. यावेळी तुरीच्या मर व वांझ रोग प्रतिबंधक याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यातील झेडपीच्या दोनशे शाळांची दुरूस्ती
जालना : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निजामकालीन शाळांच्या दुरूस्तीसाठी विशेष पुरवणी निधी मंजूर करण्यात आला आहे. निजामकालीन असलेल्या २०३ शाळांचा दर्जा व देखभाल दुरूस्तीसाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निधी मंजूर केला आहे. या निधीतून मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम लवकरच करण्यात येणार आहे. जुन्या इमारती पाडून नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे.