पान तीन लहान बातम्या क्रमांक एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST2020-12-23T04:26:30+5:302020-12-23T04:26:30+5:30
अंबड : तालुक्यातील भालगाव येथील चक्रपाणी मुळे यांच्या विहिरीवरील एक पंप व त्यांच्या भावाच्या विहिरीवरील एक पंप गुरूवारी रात्री ...

पान तीन लहान बातम्या क्रमांक एक
अंबड : तालुक्यातील भालगाव येथील चक्रपाणी मुळे यांच्या विहिरीवरील एक पंप व त्यांच्या भावाच्या विहिरीवरील एक पंप गुरूवारी रात्री चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी मुळे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याचे उपोषण
तीर्थपुरी : भोगगाव येथील शेतकरी सुधीर मुळे यांनी कापूस व सोयाबीन या पिकांचा विमा काढला होता. परंतु, अतिवृष्टीमुळे त्यांची ही पिके वाया गेली. मात्र, त्यांना पिक विमा मिळाला नाही. पीक विम्यासाठी पाठपुरावा करूनही संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने मुळे यांनी पुणे येथील कृषी कार्यालयासमोरच उपोषण सुरू केले आहे. विविध मागण्यांचे निवेदनही त्यांनी दिले आहे.
दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
घनसावंगी : श्री दत्त जयंतीनिमित्त तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील श्री स्वामी समर्थ साप्ताहिक केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारपासून सुरू होणारे हे कार्यक्रम ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूचनांचे पालन करून हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख किरण तौर यांनी दिली.
४३१ जणांची तपासणी
जालना : नवदृष्टी अभियानांतर्गत सुखापुरी येथील ४३१ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील १६१ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे निदान झाले आहे. यावेळी डॉ. साठे, डॉ. यादव, डॉ. भाकरे, डॉ. कदम, डॉ. भोजने, डॉ. राव, डॉ. निसार देशमुख, उपसभापती रईस बागवान, कटारे आदींची उपस्थिती होती.
शिंदे यांची निवड
घनसावंगी : तालुक्यातील बोलेवाडी येथील महादेव तुकाराम शिंदे यांची संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वर उढाण, अरविंद घोगरे, महेश शिंदे आदींची उपस्थिती होती.