पान तीन लहान बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST2020-12-22T04:28:51+5:302020-12-22T04:28:51+5:30

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जाणता राजा छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयातील किशोरवयीन मुलांना सोमवारी राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्यविषयक ...

Page three short news | पान तीन लहान बातम्या

पान तीन लहान बातम्या

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जाणता राजा छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयातील किशोरवयीन मुलांना सोमवारी राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. यावेळी समुपदेशक मल्हारी उमाप यांनी आरोग्याची घ्यावयाची काळजी, आहार, व्यायाम, तज्ज्ञांचा सल्ला आदी विविध आरोग्यविषयक माहिती दिली. कार्यक्रमास मुख्याध्यापक म्हस्के, रवी उखर्डे आदींची उपस्थिती होती.

मत्स्योदरी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम

अंबड : येथील मत्स्योदरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रविवारी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनाेगत व्यक्त केले. तसेच स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. विनोद जाधव, डॉ. दिगंबर भुतेकर, प्रा. दीपक राखुंडे, प्रा. रवींद्र पैठणे, प्रा. प्रकाश अकोलकर, सुनील सोनवणे, भुजंग राठोड आदींची उपस्थिती होती.

Web Title: Page three short news