पान तीन लहान बातम्या ३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST2020-12-23T04:26:34+5:302020-12-23T04:26:34+5:30
जाफराबाद : शहरातील एका मजुराचा मुलगा रविवारी हरवला होती. तो मुलगा चिखली मार्गावर इम्तियाज खान यांना दिसून आला. माहिती ...

पान तीन लहान बातम्या ३
जाफराबाद : शहरातील एका मजुराचा मुलगा रविवारी हरवला होती. तो मुलगा चिखली मार्गावर इम्तियाज खान यांना दिसून आला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले. सपोनि अभिजित मोरे व कर्मचाऱ्यांनी पालकांचा शोध घेतला. त्यानंतर त्या मुलाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत जाफराबाद पोलिसांनी ही मोहीम यशस्वी केली.
मोकाट जनावरांचा वावर
जालना : शहरातील प्रमुख मार्गासह बाजारपेठेत मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक मार्गावर मोकाट जनावरे ठाण मांडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. शिवाय महिला, बालकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन व वाहतूक शाखेने पूर्वीप्रमाणे कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
चुर्मापुरी येथील खंडोबा यात्रा उत्साहात साजरी
महाकाळा (अंकुशनगर) : अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातून मिरवणूक, कीर्तन, महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रम झाले. कार्यक्रमास दिनेश लोणे, अजय रसाळ, मोती गाडेकर, रामनाथ लोणे, सुभाष चौधरी, राजेंद्र गाडेकर, राजेंद्र लोणे, किशोर हातोटे, सुभाष लोणे, संदीप फटांगडे, सोमनाथ लोणे, बाजीराव कडु, संतोष फटांगडे, केदार लोणे यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.
अपघाताचा धोका वाढला
बदनापूर : जालना- औरंगाबाद महामार्गावरील अनेक ठिकाणचे दिशदर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. विशेषत: अपघातप्रणव क्षेत्रातील सूचना दिसेनाशा झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. चालकांसह प्रवाशांनाही सूचना फलकांअभावी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही बाब पाहता बांधकाम विभागाने आवश्यक तेथे सूचना फलक, दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.
कारवाईची मागणी
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारूविक्री जोमात सुरू आहे. शहरी, ग्रामीण भागातील हॉटेल, धाब्यांवर सर्रास दारू विक्री सुरू असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. तळीरामांच्या भांडण तंट्यात वाढ होत असून, त्यांचा नाहक त्रास महिला, मुलींनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभागाच्या वतीने अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.