पान तीन लहान बातम्या २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST2020-12-23T04:26:32+5:302020-12-23T04:26:32+5:30
जालना : रोटरी क्लब जालना सेंट्रलच्या वतीने महिला शासकीय रूग्णालयातील महिलांना बेबी किट व स्वेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी ...

पान तीन लहान बातम्या २
जालना : रोटरी क्लब जालना सेंट्रलच्या वतीने महिला शासकीय रूग्णालयातील महिलांना बेबी किट व स्वेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील, रोटरीचे अध्यक्ष सुरेंद्र मुनाेत, सचिव परेश रायठठ्ठा, केदार मुंदडा, अभय करवा, विजय इगेवार, डॉ. राजीव जेथलिया, गिरीश गिंदोडिया, नंदू वाधवा, डॉ. राहुल तोतला, सचिन लोहिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
स्वयंघोषणापत्र घ्यावे
जालना : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामसेवकांना बेबाकी प्रमाणपत्राव्यतिरिक्त इतर कोणतेही प्रमाणपत्र देण्याची सक्ती करू नये, अशी मागणी जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. त्याऐवजी उमेदवारांकडून स्वयंघोषणापत्र घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष डी. बी. काळे व इतरांची स्वाक्षरी आहे.
रस्ता दुरूस्तीची मागणी
मठपिंपळगाव : अंबड ते मार्डी, नागझरीपर्यंत रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने वाहन चालकांची गैरसोय होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. याचा प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
वाढत्या धुक्यामुळे वाहन चालक त्रस्तं
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा व परिसरात गत काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. वाढत्या थंडीत पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. या धुक्यातून वाहने चालविताना चालकांना लाईट लावूनच वाहने चालवावी लागत आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी या भागात शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. वाढत्या थंडीमुळे रब्बीतील काही पिकांसह फळबागांनाही धोका निर्माण झाला आहे.