शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

रात्रगस्तीमुळे घरफोड्या करणाऱ्यांना लगाम..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:26 AM

वाढलेल्या घरफोड्या थांबविणे आणि चोरट्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी २५ आॅगस्टपासून जिल्ह्यात रात्रगस्तीवर विशेष उपक्रम सुरू केला.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढलेल्या घरफोड्या थांबविणे आणि चोरट्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी २५ आॅगस्टपासून जिल्ह्यात रात्रगस्तीवर विशेष उपक्रम सुरू केला. जिल्हा ते ठाणे अशा तीन स्तरावर ही गस्त राबविली जात आहे. परिणामी आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत १६ घरफोड्या झाल्या आहेत. घरफोड्यांचे हे प्रमाण जुलै- आॅगस्ट मध्ये ६२ इतके होते.उद्योगनगरी असलेल्या जालना शहरासह जिल्हाभरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. घरफोड्यांचे हे प्रमाण घटविण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. २५ आॅगस्ट पासून रात्रगस्तीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठाणेस्तरावरील गस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची सुपर चेकींग तैनात करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील सर्वच गस्तीची माहिती, नियंत्रणासाठी जिल्हास्तरावरील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक यांची टीम कार्यरत ठेवण्यात आली आहे. रात्रगस्तीवरील अधिकारी, कर्मचा-यांना गणवेश सक्तीचा करण्यात आला असून, संबंधितांकडे शस्त्रेही ठेवण्यात आली आहेत. विशेषत: दर दोन तासांनी व्हिजिट बूक ठेवलेल्या ठिकाणावर जाऊन नोंदी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बँका, सराफा मार्केट, बाजारपेठेसह महत्त्वाच्या ठिकाणी, शहरातील, गावातील विविध भागात ही रात्रगस्त वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्याची गस्त पथके त्यावरील उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या सुपर चेकिंगचे असलेले नियंत्रण आणि जिल्हा पथकाकडून सर्वच ठिकाणी ठेवले जाणारे नियंत्रण यामुळे रात्र गस्तीला शिस्त लागल्याचे चित्र आहे.परिणामी आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात १८ घरफोड्या झाल्या आहेत. घरफोड्यांचे प्रमाण जुलै ते आॅगस्ट या कालावधीत ६२ इतके होते. विशेषत: जालना शहरात ५ घरफोड्यांची नोंद झाली असून, यातील तीन घरफोड्या या रात्री व दोन घरफोड्या या दिवसा झाल्या आहेत.दरम्यान, निवडणुकीच्या कालावधीतही ठिकठिकाणच्या चेक पॉइंटवर तपासणी केली जात आहे. वाहनांमधून वाहतूूक केल्या जाणाºया साहित्यांची तपासणी करण्यासह सराईत गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्याचे काम जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.गुन्हेगारांच्या नोंदी : पहाटे अहवाल सादरगस्तीवरील अधिकारी, कर्मचारी गुन्हेगार, सराईत गुन्हेगार, फरारी गुन्हेगारांच्या घरी जाऊन तपासणी करीत आहेत. संबंधितांची माहिती घेऊन त्याच्या नोंदी एका माहितीपत्रकावर घेतल्या जात आहेत.जिल्ह्यातील सर्वच गस्त पथकांनी रात्रभर केलेल्या कामकाजाचा अहवाल पहाटे ५ ते ५.३० पर्यंत कंट्रोल रूममध्ये व्हाटस्अ‍ॅप ग्रुपवर दिला जात आहे.हा अहवाल स्थानिक गुन्हे शाखेकडे येतो. स्थानिक गुन्हे शाखेत सर्व ठिकाणची माहिती संकलित करून एकत्रित अहवाल पोलीस अधीक्षकांना, अपर पोलीस अधीक्षकांना दिला जातो. त्यानंतर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार हे रात्र गस्तीबाबत ठाणे प्रभारींसह कर्मचा-यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत.वाहतूक शाखा, एडीएससह इतर विभाग कार्यरतरात्रगस्तीवर वाहतूक शाखा, एडीएस पथक, कंट्रोल रूममधील अधिकारी, कर्मचा-यांची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. ही पथके तैनात राहिल्याने रात्रगस्तीचे काम प्रभावीपणे होण्यास मदत झाली आहे.धार्मिक स्थळे, पुतळा परिसरालाही भेटीरात्रगस्तीत मंदिर, मशिद आदी धार्मिक स्थळांसह महापुरूषांच्या पुतळ्यांची पाहणी केली जात आहे. शिवाय रात्रगस्तीवर ठिकठिकाणी असलेल्या गार्डचीही पाहणी ही पथके करीत आहेत. विशेषत:गस्तीवर असताना ठराविक कालावधीत जिल्हास्तरावरीलग्रुपवर फोटो टाकणेही बंधनकारक करण्यात आले आहे.दिवसाच्या चो-या, वाहन चो-यांकडे लक्ष हवेजालना शहरातील म्हाडा कॉलनी भागात नुकतीच भरदिवसा घरफोडी झाली आहे. इतर भागातही घटनांची घडल्या आहेत. त्यामुळे दिवसा होणा-या घरफोड्या, वाहन चोरी रोखण्यासाठीही जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीसtheftचोरी