१३०० वर रूग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST2021-02-17T04:36:55+5:302021-02-17T04:36:55+5:30
३२ जणांचा मृत्यू : प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे अंबड : तालुक्यात आजवर १३७४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले ...

१३०० वर रूग्णांची कोरोनावर मात
३२ जणांचा मृत्यू : प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे
अंबड : तालुक्यात आजवर १३७४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून, त्यातील ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३०० वर रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १२ जणांवर उपचार सुरू आहेत. आढळून येणारी रूग्ण संख्या पाहता नागरिकांनी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
अंबड शहरासह तालुक्यात
कोरोनाचे आकडे पुन्हा वाढू लागले आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय विभाग, पोलीस विभाग, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली असून, बुस्टर डोसची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची स्थिती आणि त्यांचे गांभीर्य लक्षात घेत सतर्क राहणं आवश्यक आहे. गत काही दिवसांपासून कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात पुन्हा निर्बंध कडक करावे लागतील असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. अनेक
नागरिक मास्क वापर करीत नाहीत. बाजारपेठेत सुरक्षित अंतराचे तीन- तेरा झाले आहेत. लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र लोकांनी सुरक्षित अंतराचे नियम, मास्क वापरणे आवश्यक आहे.
गत काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, नियमत हात धुणे आदी नियम सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. लसीकरणाची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. परंतु, कोरोनाच्या लढ्यात वरील तीन नियम आजही महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे त्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
डॉ. जे.ए. तलवारकर, अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय